Type Here to Get Search Results !

राहुरी - आमच्याकडे पाहुन सारखा खोकत का असतो, असे म्हणुन काठी, गज व लाथा बूक्क्यांनी मारहाण

 आमच्याकडे पाहुन सारखा खोकत का असतो, असे म्हणुन काठी, गज व लाथा बूक्क्यांनी मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तु आमच्याकडे पाहुन सारखा खोकत का असतो, असे म्हणुन आरोपींनी राजेंद्र गुंजाळ यांना शिवीगाळ करुन लाकडी काठी, लोखंडी गज व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे दि. १२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. 


राजेंद्र पांडुरंग गुंजाळ, वय ४७ वर्षे, रा. आरडगाव, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास राजेंद्र गुंजाळ हे त्यांच्या घरासमोर झोपलेले होते. ते आजारी असल्याने त्यांना सारखा खोकला येत होता. त्यावेळी मच्छिंद्र जाधव हा घरासमोरुन रस्त्याने जात होता. त्यावेळी तो म्हणाला की, तु मला पाहुन का खोकला, असे म्हणुन त्याने इतर आरोपींना तेथे बोलावुन घेतले व त्यांनी शिवीगाळ केली. 


तसेच तु आमच्याकडे पाहुन सारखा खोकत का असतो, असे म्हणुन आरोपींनी राजेंद्र गुंजाळ यांना शिवीगाळ करुन लाकडी काठी, लोखंडी गज व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. घटनेनंतर राजेंद्र पांडुरंग गुंजाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 


त्या फिर्यादीवरून आरोपी मच्छिंद्र पोपट जाधव, बंडु मच्छिंद्र जाधव, गोरख पोपट जाधव, सुमित गोरख जाधव, चौघे रा. आरडगाव, ता. राहुरी, या चार जणांवर गुन्हा रजि. नं. १०५१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.