Type Here to Get Search Results !

श्रीगोंदा - श्रीगोंद्यातील साळवणदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा युवा सेनेचे सागर कोथिंबीरे यांची नगरपालिकेकडे मागणी


 


श्रीगोंद्यातील साळवणदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करा युवा सेनेचे सागर कोथिंबीरे यांची नगरपालिकेकडे  मागणी



श्रीगोंदा प्रतिनिधी:नवरात्रोत्सव लवकरच सुरू होईल. साळवणदेवी मंदिर हे श्रीगोंदा तालुक्यातील वैभव आहे. नवरात्रोत्सवानिमित्त विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात. या रस्त्याची दुरवस्था दूर करावी अशा आशयाचे निवेदन युवा सेना पहराध्यक्ष सागर कोथिंबीरे यांनी मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांना दिले.


निवेदनात म्हटले आहे को, श्रीगोंद्यातून साळवणदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असून साईड पट्टयावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्याच्या कडेने असलेल्या झाडांच्या फांद्या स्स्त्यावर आल्या भाहेत. डिव्हायडरच्या साईडने मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. तशाच प्रकारे भोळे वस्ती कडे जाणाऱ्या रोडवरील साईड पट्ट्या व खड्डे पडले असून कचरा साचलेला आहे. तरी त्वरित या रस्त्यावरील साईड पट्ट्यावरील खड्डे बुजून व डिव्हायडरच्या बाजूने झालेला कचरा काढण्यात यावा.भाविकांची होणारी गैरसोय टाळावी असे सागर कोथिंबीरे यांनी निवेदनात म्हटले आहे