Type Here to Get Search Results !

पारनेर - पर्यावरण पूरक दिपावलीची विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा

 पर्यावरण पूरक दिपावलीची विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा



आश्रमशाळा ढवळयुरीचा उपक्रम


पारनेर प्रतिनिधी


   दिवसेंदिवस प्रदूषणाची वाढत चाललेली समस्या तसेच दिपावलीच्या काळात त्यात होणारी वाढ, यामुळे मानवासह व सजीवांना होणारा त्रास याबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी, तालुका पारनेर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त व पर्यावरण पूरक दीपावलीची प्रतिज्ञा घेतली. मागील १४ वर्षांपासून राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत हा उपक्रम प्राथमिक आश्रमशाळेत राबविला जात आहे.

       याप्रसंगी मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांनी सांगितले की, दिपावली हा दिपोत्सव असून अंधारावर प्रकाशाचा विजय. परंतु दिपावली प्रसंगी संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके उडवून ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषणात वाढ होत असते. म्हणून विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त व पर्यावरण पूरक दीपावली साजरी करावी.  राष्ट्रीय हरित सेना योजना प्रमुख शिक्षक लतीफ राजे यांनी विद्यार्थ्यांना दीपावलीच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषणाची माहिती देऊन त्याबाबत जागृती निर्माण केली तसेच विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दीपावलीची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देखील आपण कमीत कमी फटाके उडवून पर्यावरण पूरक दीपावली साजरी करू तसेच दीपावली मध्ये फटाके न घेतल्यामुळे शिल्लक राहिलेल्या पैशांची बचत बँक तयार करून पैशाची बचत करू असेही सांगितले.

       यावेळी शिक्षक वसंत काळे, मनीषा गर्जे, रशिदा तांबोळी, संगीता मोरे, संतोष पट्टेकर, राजाराम वाघ, देवका पायमोडे, प्रशांत पादीर, अमोल बांगर,भावना बेरड, सोनाली नारायणी, कृष्णा धुमाळ, आप्पासाहेब वाबळे, समाधान भुसारे, गणेश लाकूडझोडे, सुरेंद्र पाटील, संदीप जाटे, सनी काळे, रभाजी भागवत, सुरजसिंग वाणी, विठ्ठल बाचकर, आदी उपस्थित होते