सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांचा संकल्प.
फटाके नको आम्हाला, पुस्तक द्या वाचायला, फेरी काढून जनजागृती.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दीपावली सुट्टिला जाण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रदूषण टाळण्याकरिता फटाकेमुक्त दीपावली साजरी करण्याचा संकल्प केला. सुमारे अठराशे विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची प्रतिज्ञा घेतली.
कृषी विद्यापीठ परिसरात फेरी काढून फटाके विरोधी जनजागृती केली. 'फटाके नको आम्हाला, पुस्तके द्या वाचायला,' अशा घोषणा दिल्या. मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे यांनी फटाके फोडल्या नंतर बाहेर पडणारे रासायनिक घटक व विषारी वायू व त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगितले. तसेच मुले, वृद्ध व्यक्ती, पशुपक्षी यांना या प्रदूषणाचा परिणाम होतो.
फटाके द्वारे अनेक ठिकाणी आग लागून अपघात व खूप नुकसान होते. फटाके खरेदी ऐवजी या पैशांचा उपयोग विद्यार्थ्यांनी वाचनीय पुस्तके किंवा छंद जोपसण्याकरिता करावा. तसेच आपल्या सभोवतालच्या गरीब व्यक्तींना दीपावली निमित्त मदत करून आनंदात सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पर्यावरण पूरक दिप लावून दीपावलीचा आनंद घ्यावा.
या उपक्रमाकरिता क्रीडा शिक्षक घनश्याम सानप, प्रा. जितेंद्र मेटकर, संतोष जाधव, हलीम शेख, तुकाराम जाधव, संदिप जाधव, बाबासाहेब शेलार, मनिषा आढाव, वैजयंती बुऱ्हाडे, दिप्ती कराळे, मोनाली म्हसे, सविता गव्हाणे या शिक्षकांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे सभापती डॉ. प्रमोद रसाळ सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे, उप मुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, या उपक्रमा बद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
