Type Here to Get Search Results !

राहुरी - ६ तोळे सोने व चार चाकी गाडी घेण्यासाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ

 ६ तोळे सोने व चार चाकी गाडी घेण्यासाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


६ तोळे सोने व चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून प्रेरणा जाधव या २३ वर्षीय विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याबाबत पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


प्रेरणा ऋषीकेश जाधव, वय २३ वर्षे, धंदा- घरकाम/मजुरी, रा. नांदुर ढोक, ता. वैजापुर, जि. छत्रपती संभाजी नगर, हल्ली रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रेरणा जाधव हिचे लग्न दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी ऋषीकेश जाधव याच्याशी झाला होता. 


लग्नानंतर सासरच्या लोकांनी सुमारे ५ महीने प्रेरणा जाधव हिला चांगले वागविले. त्यानंतर घरातील कामावरून व किरकोळ कारणावरून सासरचे लोक प्रेरणा जाधव हिला वारंवार शिवीगाळ करून मारहाण करत असे. त्यानंतर ६ तोळे सोने व चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावेत म्हणून प्रेरणा जाधव हिला शिविगाळ करत लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यात आली. 


प्रेरणा ऋषीकेश जाधव या विवाहित तरुणीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पती- ऋषीकेश विलास जाधव, सासु- सुरेखा विलास जाधव, सासरा- विलास एकनाथ जाधव, ननंद- ऋतुजा विलास जाधव, सर्व रा. नांदुर ढोक, ता. वैजापुर, जि. छत्रपती संभाजी नगर या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ११३४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.