Type Here to Get Search Results !

राहुरी - १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या तीन गाया भामट्यांनी पळवील्या.

 १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या तीन गाया भामट्यांनी पळवील्या.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील गणेश थोरात या शेतकऱ्याच्या तीन गाया अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात प्रचंड खळबळ उडाली.


गणेश उत्तम थोरात, वय ४० वर्षे, धंदा- शेती, हे राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे कुटुंबासह रहावयास असुन त्यांची शेती पिंपरी अवघड शिवारात आहे. तेथे जनावरांसाठी पत्रा सेड केले असुन त्यामध्ये सध्या तीन गाया व एक कालवड होती. दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गणेश थोरात यांनी तीन गाया व एक कालवड शेतातील सेडमध्ये बांधुन घरी निघुन आले होते.


त्यानंतर दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता गणेश थोरात हे पुन्हा शेतात गेले असता शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या तीन गाया दिसल्या नाही. गाया बांधलेल्या जागी फक्त दावे होते. या दरम्यान अज्ञात भामट्यांनी गणेश थोरात यांच्या १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या तीन गाया चोरून नेल्याचे लक्षात आले.


गणेश थोरात यांनी आजूबाजूला व परिसरात गायांचा शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाही. अखेर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ११३३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.