स्व. आ. कर्डिले यांना श्रद्धांजली म्हणून राहुरी शहर बंद.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी विधानसभेचे आमदार तथा माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष कै. शिवाजीराव कर्डिले साहेब यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी होत आहे.
कै. आ. शिवाजीराव कर्डिले साहेब यांना श्रद्धांजली म्हणून रविवार दि. २६ रोजी दुपारी १२ वाजे पर्यंत राहुरी शहर बंद ठेवून व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे ही विनंती. असे आवाहन राहुरी शहर व्यापारी असोसिएशन च्या वतीने करण्यात आले.
