ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या ज्योती दीदींचा देहत्याग.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी काल दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता देहत्याग केला.
गेल्या अनेक वर्षांपासून ज्योती दीदी या राहुरी फॅक्टरी तसेच परिसरात आध्यात्मिक सेवा, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि ध्यानसाधनेचा प्रसार यासाठी अविरत कार्यरत होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य लोकांनी सकारात्मक विचार, आत्मज्ञान आणि राजयोग साधनेचा लाभ घेतला. त्यांच्या साध्या, प्रेमळ व प्रेरणादायी व्यक्तिमत्वामुळे त्या सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेल्या.
त्यांच्या पार्थिव देहावर आज शनिवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी राहुरी फॅक्टरी स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
