Type Here to Get Search Results !

कान्हुर पठार येथे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

 पारनेर-  कान्हुर पठार येथे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ



पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार येथे आज विकासाचा नवा अध्याय सुरू झाला. सन २०२४-२०२५ जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनुसार मंजूर करण्यात आलेल्या ₹५ लाखांच्या कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.


या कामामुळे हनुमान मंदिराच्या पाठीमागील भागाचा परिसर अधिक सुशोभित आणि सोयीस्कर होणार असून, स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारे हे पाऊल विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.


या प्रसंगी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ दादा कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, शेतकरी नेते अनिलजी देठे, तसेच सागर व्यवहारे, बाळासाहेब ठुबे, अर्जुन नवले, सुशांत ठुबे, वैभव साळवे, विशाल लोंढे, बी.टी.व्यवहारे (मेजर), कानिफनाथ ठुबे, गोकुळ ठुबे, नवनाथ ठुबे यांसह स्थानिक व परीसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.


कान्हुर पठार आणि परिसरातील ग्रामस्थांनी या विकासकामाच्या प्रारंभाचे स्वागत करत आमदार दाते सरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.


> “जनतेच्या विश्वासावर उभं राहिलेलं नेतृत्व — आमदार काशिनाथ दाते सर, विकासाच्या प्रत्येक पावलावर जनसामान्यांच्या सोबत!”