वडिल व मुलीला लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
वडिलांना मारहाण करत असताना मुलगी सोडायला गेली असता आरोपींनी वडिल व मुलीला शिवीगाळ करुन लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली.
सारीका अमोल म्हस्के, वय ३० वर्षे, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता सारिका म्हस्के ह्या देवळाली प्रवरा येथील बाजारतळावर दुध आणण्यासाठी जात होत्या.
तेव्हा शहीद अब्दुल हमीद चौक येथे सारिका म्हस्के यांचे वडील संपत धोत्रे यांना आरोपी लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण करीत होते. त्यावेळी सारिका म्हस्के आरोपींना समजावुन सांगत असताना आरोपींना त्याचा राग आल्याने त्यांनी सारिका म्हस्के यांना देखील शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली.
घटने नंतर सारीका अमोल म्हस्के यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी राहुल सरोदे, संतोष सरोदे, ज्ञानेश्वर सरोदे, दिलीप सरोदे सर्व रा. देवळाली प्रवरा तसेच बबन भांड, रा. गुहा, ता. राहुरी, या पाच जणांवर गुन्हा रजि. नं. ११४९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२), १९१ (१), १९१ (३), १९०, ११५ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
