Type Here to Get Search Results !

श्रीगोंदा - नानासाहेब कोथिंबिरे यांचा आई-वडिलांच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल

 नानासाहेब कोथिंबिरे यांचा आई-वडिलांच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल;

नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत मजबूत दावेदार



श्रीगोंदा प्रतिनिधी 

दि. १६ नोव्हेंबर २०२५


श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना शहरातील सामान्यजनांचा चेहरा म्हणून ओळख असलेले मा. उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे यांनी आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आपल्या आई-वडिलांच्या पूज्य हस्ते नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. कुटुंबाच्या आशीर्वादाने राजकीय प्रवासाची नवी वाटचाल सुरू केल्याने शहरात भावनिक वातावरण पाहायला मिळाले. जणमत चाचणी मध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोथिंबीरे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.




नानासाहेब कोथिंबिरे हे गेल्या काही वर्षांत राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सतत लढा देणारे कार्यकर्ता म्हणून उभे राहिले आहेत. उपनगराध्यक्ष पदावर काम करताना त्यांनी नागरिकांसाठी दरवाजे सदैव खुले ठेवणे,पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करून काम करण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.


विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग

यामुळे त्यांची लोकप्रियता शहरभर वाढली आहे.

त्यांच्या कार्यकाळात ‘सामान्यांचा माणूस’ अशी प्रतिमा त्यांनी जपली असून शहरातील युवा वर्ग, व्यावसायिक, त्यांच्या प्रति सकारात्मकता पहायला मिळते.


भाजपकडून उमेदवारीची इच्छा — पक्षाच्या निर्णयाला प्राधान्य


उमेदवारी अर्ज दाखल करताना माध्यमांशी बोलताना कोथिंबिरे म्हणाले,

“मी भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करण्याचा इच्छुक आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेवला तर पूर्ण ताकदीने निवडणूक लढवेन. तरीही भाजप जो निर्णय घेईल तो माला मान्य असेल. पक्षाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली नाही तरीही पक्षाने सोपवलेल्या जबाबदारीसाठी मी सदैव तयार आहे.”


त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षनिष्ठा आणि संघटनाप्रतीची बांधिलकी स्पष्ट दिसून आली.


शहरात चर्चांना वेग


कोथिंबिरे यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर श्रीगोंद्यात राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपमध्ये विविध इच्छुकांची नावं चर्चेत असली तरी नानासाहेब कोथिंबिरे यांचा मजबूत जनसंपर्क आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांना प्रमुख दावेदारांच्या यादीत वरचे स्थान देतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.


निवडणुकीत उत्सुकता वाढली


नगराध्यक्षपदासाठीचा हा औपचारिक अर्ज आणि त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती यामुळे भाजपच्या मोर्चेबांधणीत नवा उत्साह निर्माण झाला आहे. पक्ष नेतृत्व आगामी काही दिवसांत उमेदवार निश्चित करणार असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष भाजपच्या निर्णयाकडे लागले आहे.


श्रीगोंद्यातील राजकीय वातावरण अधिक तापत असून येत्या २-३ दिवसांत या निवडणुकीत नवे वळण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.