नीलम ताई गोऱ्हे व अण्णा बनसोडे यांच्या हस्ते दैनिक समर्थ गांवकरी दिवाळी अंकाचे प्रकाशन!
पिंपरी चिंचवड:
पुणे-पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. पत्रकारिता, साहित्य, सामाजिक कार्य आणि लोकसंपर्क या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात विधानसभा उपसभापती नीलम ताई गोऱ्हे व विधान परिषदेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या हस्ते दैनिक समर्थ गांवकरी दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दिवाळी अंक, घड्याळ आणि शाल देऊन बहुमानपूर्वक सत्कार केला.
कार्यक्रमात साहित्य, कला आणि पत्रकारितेतील दिग्गजही उपस्थित होते. ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे, पद्यश्री पुरस्कार विजेते प्रभू हरणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल सावंत, तसेच संघाचे ब्रँड अँबेसिडर संजय फुलसुंदर या मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेच्या सामाजिक भानाची, तसेच ग्रामीण पत्रकारितेच्या योगदानाची विशेष दखल घेण्यात आली.
संघटनेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याने पत्रकार आणि साहित्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा, उत्साह आणि नवचैतन्य निर्माण केले.




