ओंकार शुगरची कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के पगारवाढ
श्रीगोंदा =ओंकार शुगर ग्रुप मधील सर्व अधिकारी व कर्मचार्यांना २० टक्के पगारवाढ वाढ करण्यात आली आहे अशी माहिती ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली
बोत्रेपाटील पुढे म्हणाले की
“कर्मचारी ही ओंकार शुगर ग्रुपची खरी ताकद आहे.
त्यांच्या परिश्रमामुळेच ओंकार ग्रुपने अल्पावधीत राज्यातील १८ साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करून उत्पादन क्षमतेत मोठी वाढ साध्य केली आहे. ही वेतनवाढ कर्मचारीवर्गाप्रती त्यांच्या परिश्रमाचे व त्यागाचे मोल आहे.”
समूहात सध्या १६,५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत
२०% पगारवाढ लागू झाल्यानंतर कर्मचार्यांच्या आर्थिक स्थैर्यात अधिक वाढ होणार असून आगामी गाळप हंगामासाठी यामुळे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
