Type Here to Get Search Results !

श्रीरामपूर :- पोलिसांच्या रेकॉर्डवरील व गांजा प्रकरणातील अट्टल गुन्हेगार सलीम शेख याच्या हस्ते आमदार ओगले यांच्या स्थानीक विकास निधीतून झालेल्या विकास कामांचे उदघाट्न

 श्रीरामपूर(प्रतिनिधी) :- पोलिसांच्या रेकॉर्डवरील व गांजा प्रकरणातील अट्टल गुन्हेगार सलीम शेख याच्या हस्ते आमदार ओगले यांच्या स्थानीक विकास निधीतून झालेल्या विकास कामांचे उदघाट्न करणारे आज निवडणुकीच्या निमित्ताने मोठं मोठाल्या गप्पा मारून मतदारांना मुर्खात काढत असलेतरी हिंदू युवकांची पिढी नशेच्या आहारी ढकलण्याचे पाप करणाऱ्या व हिंदू युवकांना शांतपणे संपवण्याचे काम काँग्रेस उमेदवार करन ससाने व आमदार ओगले हे करत आहेत यांना शहरातील जनता कदापी माफ करणार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी व्यक्त केली आहे. 



      आपल्या आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्रीनिवास बिहाणी यांनी म्हंटले आहे की, शहरात गुन्हेगारी वाढली म्हणून उठसुठ कोल्हेकुई करणारेच आज गांजा प्रकरणातील अट्टल गुन्हेगाराच्या हस्ते आमदार निधीतुन फकीर वाडा या भागात झालेल्या विकास कामांचे उदघाट्न करत आहेत.आचारसंहिता लागू होण्याअगोदर व पालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून मतदारांना भुलवण्याठी मुस्लिम मोहल्ल्यातील फकीरवाडा या भागात पेव्हिंग ब्लॉक आमदार ओगले यांच्या स्थानीक विकास निधीतून बसवण्यात आले त्या कामाचे उदघाट्न स्थानीक प्रतिष्ठितांच्या हस्ते किंवा सर्वसामान्यांच्या हस्ते करने अपेक्षित होते पण त्या कामाचे उदघाट्न पोलिसांच्या रेकॉर्डवरील व गांजा प्रकरणातील अट्टल गुन्हेगाराच्या हस्ते केले.त्या उदघाटक गुन्हेगाराने अवैधमार्गाने शहरात गांजा आणून शहरातील असंख्य हिंदू युवकांना गांजाच्या आहारी लावले असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.शहरातील हिंदू युवक मोठया प्रमाणात गांजा नशेच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.अशा अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांना राजकीय आश्रय देण्याचे काम शहरात अनेक वर्षांपासून काँग्रेसी ससाने गटाने अखंडपणे केले आहे.या उदघाट्न कार्यक्रमास आज प्रभाग क्रमांक बारा मधून निवडणूक रिंगणात असलेले काँग्रेसचे उमेदवार असलेले भाग्येश लोखंडे व गुड्डू यादव हे देखील उपस्थित होते अशा उमेदवारांना त्यांची लायकी मतदारच दाखवतील तसेच हिंदू युवकांना संपवण्याचे शांतपणे चालू असलेले हे काँग्रेसी षडयंत्र थांबवायचे असेल तर काँग्रेस उमेदवार करन ससाने व त्यांच्या उमेदवारांना  सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे असे आवाहन देखील श्रीनिवास बिहाणी यांनी केले आहे.