Type Here to Get Search Results !

राहुरी - घर बांधण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा छळ

 घर बांधण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा छळ.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


घर बांधण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये घेऊन आणावेत, या मागणीसाठी एका २३ वर्षीय विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दोघांनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


सिया गणेश शिंदे, वय २३ वर्षे, रा पठारवाडी, वनकुटे, ता. पारनेर, ह.रा. गोंटुबे आखाडा, ता. राहुरी, या तरुणीचे लग्न दि. १७ एप्रिल २०२० रोजी गणेश भाऊसाहेब शिंदे, रा पठारवाडी, वनकुटे, ता. पारनेर याच्याशी झाले होते. सासरच्या लोकांनी सिया शिंदे हिला सुरुवातीचे दोन वर्ष व्यवस्थित नांदवले.


त्यानंतर आपल्याला घर बांधायचे आहे, त्याकरिता तु तुझ्या आईकडुन ५० हजार रुपये घेवुन ये. अशी मागणी सासरचे लोक करू लागले. तेव्हा सिंह शिंदे या विवाहित तरुणने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.


सिया गणेश शिंदे या विवाहित तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी गणेश भाऊसाहेब शिंदे व लताबाई भाऊसाहे शिंदे, दोघे रा. पठारवाडी, वनकुटे, ता. पारनेर, या दोघांवर गुन्हा रजी. नं. ११७९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३ (५), ३५१ (२), ३५२, ८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.