Type Here to Get Search Results !

राहुरी - आप्पासाहेब नाईकवाडे यांना शिवीगाळ व दमदाटी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.


 


आप्पासाहेब नाईकवाडे यांना शिवीगाळ व दमदाटी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तुमच्या गायी आमच्या शेतात चरायला आल्या होत्या. असे म्हणत आरोपींनी आप्पासाहेब नाईकवाडे व त्यांच्या आईला शिवीगाळ दमदाटी करून गाईंना दगड मारून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथे दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली. 


आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे, वय ३९ वर्षे, धंदा व्हेटर्नरी डॉक्टर, रा. तांदुळनेर, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आप्पासाहेब नाईकवाडे हे मानद प्राणी कल्याण अधिकारी म्हणून काम करतात. तसेच ते राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथे गोशाळा चालवितात. 


दि. २ नोव्हेंबर २०२५षरोजी दुपारी २ वाजे दरम्यान आप्पासाहेब नाईकवाडे हे तांभेरे गावचे शिवारातील त्यांच्या शेतातील खोलीमध्ये काम करत होते. तेथे शेजारील मोकळ्या शेतामध्ये आप्पासाहेब नाईकवाडे यांची आई व मुलगा गोशाळेमधील जनावरे चारत होते. सदर ठिकाणी आरोपी ऋषीकेश सरोदे हा आप्पासाहेब नाईकवाडे यांच्या आई व मुलाला शिवीगाळ करत होता.


तेव्हा आप्पासाहेब नाईकवाडे यांनी तेथे जाऊन आरोपीला शिवीगाळ का करतो असे विचारले. तेव्हा आरोपी म्हणाला की, तुमच्या गाई माझे शेतामध्ये आल्या होत्या. माझे शेतामध्ये गायी येवु द्यायच्या नाहीत. असे म्हणुन त्याने गायांना दगड मारले. त्यात गायी जखमी झाल्या. तसेच आरोपींनी आप्पासाहेब नाईकवाडे व त्यांच्या आईला शिवीगाळ दमलाटी केली. तसेच तुम्ही जास्तच शहानपणा केला तर तुझ्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करुन राजकीय व संघटने मार्फत दबाब आणुन तुझी गोशाळा बंद करु, अशी धमकी दिली.


घटनेनंतर आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी ऋषीकेश दत्तात्रय सरोदे, दत्तात्रय भागवत सरोदे, मिनाक्षी दत्तात्रय सरोदे, सर्व रा. रामपुर, ता. राहुरी, या तिघांवर गुन्हा रजि. नं. ११७७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३ (५), ३५१ (२), ३५२ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.