मा.खा. सुजयदादा विखेंच्या वाढदिवसानिमित्त जवळेत रक्तदान शिबिर संपन्न
पारनेर- प्रतिनिधी
मा.खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जवळेत भाजप पारनेर तालुका, विश्वनाथ दादा कोरडे युवा मंच आणि अष्टविनायक रक्तपेढी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवून दिली.
यावेळी भाजप राज्य परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे, उद्योजक बाळासाहेब सालके पा., राहुल पाटील शिंदे, सागर आबा मैड, दत्तानाना पवार, संदीप सालके पा., सोनालीताई सालके, गणेश सालके, अनिल मदगे, संपत सालके पा., जयदीप सालके पा.,कानिफनाथ पठारे, विशाल पठारे, माउली पठारे, रमेश सालके, माउली वरखडे, अर्जुन नवले, सुशांत ठुबे, भरत ठुबे, रमेश गाडगे, मोहन काळे, दिनेशदादा बाबर, भाऊसाहेब मेचे, अतुल माने, संग्राम पावडे, तुकाराम येवले, नवनाथ सालके, शब्बीर इनामदार, अमोल गायकवाड, कैलास बरशिले, अण्णा सालके, शिवम बढे, तुषार बढे यांसह मोठ्या प्रमाणात जवळा व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रक्तदान करणे ही काळाची गरज आहे आणि रक्तदान करणे हे आपले कर्तव्य असून ते मोठ्या प्रमाणात केले जावे, हे आवाहन विश्वनाथ दादा कोरडे युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले.
