Type Here to Get Search Results !

पारनेर - निघोज आणी परिसरात पुर्णवेळ विजपुरवठा. - आमदार काशिनाथ दाते


 


निघोज आणी परिसरात पुर्णवेळ विजपुरवठा.

             आमदार काशिनाथ दाते 


  पारनेर / प्रतिनिधी 


 निघोज आणी परिसरातील गावांसाठी लवकर पुर्णवेळ विजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिली आहे. सध्या बिबट्याची भिती तसेच पारनेर तालुक्यातील बहुसंख्य गावामधील बागायत शेती असल्याने पाणी भरण्यासाठी किंवा शेतीचे ईतर कामे करण्यासाठी दिवसभर विजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे  यांच्याकडे करण्यात आली होती. त्यासंदर्भात पुर्ण मतदारसंघात पुर्ण वेळ विजपुरवठा होण्यासाठी संबंधित सबस्टेशन मध्ये कोनती यंत्रणा गरजेची आहे त्याचा आढावा विज वितरण मंडळाने घेतला आहे. याबाबत पारनेरचे कार्यकारी अभियंता चव्हाण व उप कार्यकारी अभियंता गहांडुळे यांच्या बरोबर चर्चा झाली आहे. याबाबत निघोज सबस्टेशन मध्ये काही कामे अपूर्ण असून येत्या चार दोन दिवसांत ही कामे पुर्ण झाल्यानंतर निघोज आणी परिसरातील जवळपास वीस ते पंचवीस गावांमधील विजपुरवठा पुर्णवेळ सुरु राहणार आहे. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची भिती आहे. यासाठी वनविभागाला सक्षम राहण्याची सुचना दिली आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या बरोबर चर्चा झाली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वनविभागाकडून जवळपास 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. आवश्यक तेथे पिंजरे लावण्यात येणार आहे. वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी वेळोवेळी दक्ष राहुन बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मात्र बिबट्याच्या भितीने शेतीची कामे करता येत नाहीत यासाठी पुर्णवेळ व पुर्णदाबाने विजपुरवठा करण्यासाठी विज यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाला सत्क सुचना दिल्याने विज यंत्रणा लवकर कार्यान्वित होण्यासाठी पारनेरचे कार्यकारी अभियंता चव्हाण व उप कार्यकारी अभियंता गहांडुळे या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व सबस्टेशनचा सर्व्हे करुण अहवाल सादर केला असून लवकरात लवकर हे कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच निघोज सबस्टेशन काम पुर्णत्वास येणार असून दिवसभर विजपुरवठा होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार दाते सर यांनी दिली आहे.