विकासकामांसाठी महायुती सरकार भक्कम.
आमदार काशिनाथ दाते
पारनेर /प्रतिनिधी
ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे ही महायुती सरकारची संकल्पना राज्य सरकार राबवीत असून वर्षभरात मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला असून येत्या सहा महिन्यांत या विकासकामांची प्रचिती प्रत्यक्षात पाहावयास मिळणार असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत जनतेने भक्कमपणे महायुतीच्या मागे उभे राहण्याचे आवाहन आमदार काशिनाथ दाते सर यांनी केले आहे. देवीभोयरे येथील ४४ लाख रुपयांचा निधी विवीध विकासकामांसाठी देण्यात आला याचा भुमिपुजन शुभारंभ आमदार दाते सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सोनाली सालके, सरपंच अशोकराव मुळे, अंबिका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, ज्येष्ठ नेते बाबुराव मुळे, माजी उपसरपंच विकासशेठ सावंत, सोनाबाई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार दाते सर बोलत होते. यावेळी माजी सरपंच विठ्ठलराव सरडे, आदर्श शिक्षक विश्वनाथ गाजरे, मुळे ताई, गोपिचंद बेलोटे, कमलाकर बेलोटे, सत्यवान बेलोटे,विजय बेलोटे, शरद बोरुडे, शहाजी बेलोटे, अमोल गजरे, दिनेश गायकवाड, गणेश बेलोटे, अरविंद बेलोटे, बाबुराव बेलोटे, संजय बेलोटे, रामदास बेलोटे, जगन्नाथ बेलोटे, नरेंद्र बेलोटे,शिवाजी बेलोटे, तसेच महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार दाते सर म्हणाले देवीभोयरे गाव व परिसरातील विकासासाठी ४४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून तातडीने ही विकासकामे मार्गी लागणार आहेत.
मतदारसंघाचा विकास करताना जनतेच्या सर्व प्रकारच्या सुवीधांचा विचार करून विकासकामे होणार आहेत. रस्ते, सभामंडप, लाईटचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सक्षम आहोत.राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आपणांस मोठ्या प्रमाणात पाठबळ आहे. माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील हे कार्यक्षम नेतृत्व असल्याने या भागाच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. जनतेने या नेत्वृत्वाला मोठे करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे. माजी उपसरपंच विकासशेठ सावंत यावेळी म्हणाले गेली वर्षभरात आमदार दाते सर यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. देवीभोयरे गावचा विकास करण्यासाठी दाते सर यांनी लगेच ४४ लाख रुपयांचा विकास निधी दिला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून विकास होत आहे. ही जनतेला खात्री असल्याने उद्याच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार असल्याची ग्वाही सावंत यांनी दिली आहे.
