Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवांकुर विद्यालयाचे रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेमध्ये यश

 शिवांकुर विद्यालयाचे रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेमध्ये यश 



रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य, कांस्य अशी पदके मिळवून नेत्र दीपक कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील एकूण 105 विद्यार्थी बसले होते. त्यामधील 18 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले 17विद्यार्थ्यांना रौप्य पदक, 05विद्यार्थ्यांना कांस्यपदक तर 05विद्यार्थ्यांना सरप्राईज गिफ्ट व कॉन्सिलेशन प्राईज मिळाले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार व सचिव डॉ प्रकाश पवार यांनी  कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेतील उत्तुंग यशासाठी संस्थेचे उपाध्यक्ष गणेश शेळके, विश्वस्त मंगलताई पवार, डॉ नरेंद्र इंगळे, डॉ. गौरी पवार, सौ मंगलताई पवार यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील कला शिक्षिका सुजाता तारडे यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता तारडे  व आभार मयुर धुमाळ यांनी केले. 

या कार्यक्रमास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, , सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, सौरभ भांबळ प्रियंका पांढरे, ज्योती शेळके, शितल फाटक, सुजाता तारडे, सुनीता ढोकणे  अनिता म्हसे मोहिनी पेरणे रोहिणी हापसे सुरेखा मकासरे सोनाली कुमावतअनिता लांबे,  दुर्गा बारवेकर, व लिपिक भाग्यश्री झांबरे शिपाई शारदा तमनर आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.