Type Here to Get Search Results !

पारनेर - पारनेर चे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर साहेब यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले

 पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये  पोलीस खाते व विद्यार्थी समुदेशन व्हावे यासाठी पारनेर चे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर साहेब यांनी विद्यार्थ्याना मोलाचे  मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी स्वभाविक जीवना मध्ये कशा प्रकारे यश प्राप्त करावे या विषयी सांगितले. खेडकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून सावध राहावे मोबाईलचा अतिवापर टाळावा तसेच मेसेज फॉरवर्ड  करताना विचारपूर्वक करावे . येत्या आगामी काळामध्ये तुम्ही विद्यार्थी देशाचे भविष्य असून तुमच्याकडून खूप आशा आहेत.



        यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब खिलारी सर यांच्या हस्ते  पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे कौन्सिलिंग सदस्य डॉ. भाऊसाहेब खिलारी  , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड,  पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल पोपट मोकाते यांच्यासह ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मल्हारी वागसकर सर,विजय सोबले सर ,नारायण शेळके सर, अतुल सैद सर,सोबल सर,हिंगडे सर, नितीन ढोकळे,निलेश जासूद सर,रवींद्र मते सर,सुशांत खेडकर ,सोनल रोहोकले,श्रीमती नीलम खिलारी मॅडम, सुनील झावरे सर,वैशाली गायके,सुरेखा ठाणग यांच्यासह सर्व  शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते . या कार्यक्रमाच्या शेवटी  निलेश जासूद सर यांनी उपस्थितांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.