Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवांकुर विद्यालयात गणित, विज्ञान, चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन

 शिवांकुर विद्यालयात गणित, विज्ञान, चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन 



शिवांकुर विद्यालय कोंढवड या ठिकाणी  गणित, विज्ञान, चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी केले. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान विषयाचे आकर्षक मॉडेल तयार केले होते त्यामध्ये इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये शेतीवर आधारित अनेक मॉडेल विद्यार्थ्यांनी बनवले या सर्व प्रदर्शनाचे परीक्षण डॉ. प्रकाश पवार सर यांनी केले व या प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे व संबंधीत विषय शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.  

या प्रदर्शनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष गणेश शेळके, विश्वस्त मंगलताई पवार, डॉ नरेंद्र इंगळे, डॉ. गौरी पवार, सौ मंगलताई पवार यांनी  विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील  शिक्षिका सुनिता ढोकणे, भाऊसाहेब करपे, मोहिनी पेरणे, सुरेखा मकासरे यांचे मार्गदर्शन लाभले.

या विज्ञान प्रदर्शनास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, सौरभ भांबळ, प्रियंका पांढरे, ज्योती शेळके, शितल फाटक, सुजाता तारडे, सुनीता ढोकणे,  अनिता म्हसे, मोहिनी पेरणे, रोहिणी हापसे, सुरेखा मकासरे, सोनाली कुमावत, अनिता लांबे,  दुर्गा बारवेकर व लिपिक भाग्यश्री झांबरे, शिपाई शारदा तमनर आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.