Type Here to Get Search Results !

राहुरी - पत्रकार प्रसाद मैड राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

 पत्रकार प्रसाद मैड राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राहुरी येथील पत्रकार प्रसाद भगवान मैड यांना धर्माचार्य श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर दत्तात्रेय दहिवाल महाराज यांच्या शुभहस्ते आदर्श पत्रकारिता पुरस्काराने नुकतेच लोणी येथे सन्मानित करण्यात आले.


रणरागिणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. ए. डॉ. शंकर अदानी तर स्वागताध्यक्ष पदी सुप्रसिद्ध उद्योजक अजय नागरे होते. सुवर्ण भरारीच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. श्रीमती सारिकाताई नागरे, प्रदेशाध्यक्ष संदिप मानकर, राज्य प्रवक्ते रविशेठ माळवे यांची उपस्थिती होती.


राहुरी येथील पत्रकार प्रसाद मैड गेल्या 30 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या वृत्तपत्रातून त्यांनी सामाजिक व अन्य विषयांवरलिखाण करून आपली छाप उमटवलेली आहे. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून देखील ते कार्यरत आहेत. पत्रकार मैड यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्या बद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.