Type Here to Get Search Results !

राहुरी - मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार- संतोष चोळके

 मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार- संतोष चोळके.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील प्रभाग क्रमांक पाच मधील शेटेवाडी येथे शाळेची झालेली दुरवस्था बघून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, प्राथमिक जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, राहुरीचे गट शिक्षणाधिकारी तुंबारे, देवळाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी पाटील या सर्वांना फोन कॉल करून धारेवर धरले.


यामध्ये देवळाली नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या वादामध्ये येथे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हे या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. येथे बिल्डिंग निकामी झाल्यामुळे या बिल्डिंगचा स्लॅब केव्हाही खाली गळून पडतोय. दोन वर्षांपूर्वी व आज एका विद्यार्थ्याच्या अंगावरती बिल्डिंगचा स्लॅब निखळून तुकडे गळून पडले होते. परंतु शिक्षकांनी मध्ये हात घालून तो विद्यार्थी वाचवला. ही बिल्डिंग रिपेअर व्हावी किंवा या जागी नवीन बिल्डिंग बांधण्यात यावी.


यासाठी येथील मुख्याध्यापकांनी तीन वर्षापासून प्रयत्न चालवलेले आहेत. तसे प्रस्तावय जिल्हा परिषदेला पाठवले आहेत. परंतु येथील राजकीय उदासीनता व देवळाली नगरपालिका व जिल्हा परिषद यांच्यातील वाद या कारणाने येथील विद्यार्थ्यांना नवीन बिल्डिंग शाळा बांधून मिळत नाही.


हे वाद असे आहे की शाळेची 14 गुंठे जागा ही जिल्हा परिषदेची मालकीची आहे या जागेमध्ये पूर्वी देवळाली नगरपालिकेने शाळेचे बांधकाम करून येथे बिल्डिंग बनवली होती. ही बिल्डिंग पूर्वी झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे 40 वर्ष एक्सपायरी डेट च्या आधीच खराब होऊन ती मोडकळीस आलेली आहे. यामध्ये पालिकेची बिल्डिंग असल्याकारणाने जिल्हा परिषद ही बिल्डिंग पाडत नाही आणि जुनी बिल्डिंग असल्याकारणाने जिल्हा परिषद या ठिकाणी नवीन बिल्डिंग बांधण्याकरता प्रस्ताव देत नाही.


या जुन्या बिल्डिंगचं निर्लोकन केल्यानंतर (म्हणजे ती पाडल्या नंतर) या ठिकाणी जिल्हा परिषद नवीन बिल्डिंग किंवा इमारत बांधू शकते. तसं तातडीचा प्रस्तावही ते तयार करण्यास तयार आहेत. परंतु अडकाठी नगरपालिकेची आहे. या ठिकाणी धोकादायक बिल्डिंग असल्या कारणाने पालकांनी शाळेतील विद्यार्थी काढून घेऊन इतरत्र शाळेत टाकले आहेत.


आज या वादाचा साक्षमुक्ष लावण्या करता जिल्हाध्यक्षांनी सर्व अधिकाऱ्यांना फोन लावून सर्वांना धारेवर धरून ते काम नगरपालिकेचेच आहे हे सिद्ध केले. त्यामुळे आता देवळाली नगरपालिका काय भूमिका घेतली याकडे पालकांचे लक्ष लागलेले आहेत. हे काम पालिकेने तातडीने मार्गी न लावल्यास पालिकेच्या बांधकाम विभागाला व मुख्याधिकारी यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा जिल्हाध्यक्षांनी दिला.