Type Here to Get Search Results !

राहुरी - सत्यम धसाळ याची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड.


 


सत्यम धसाळ याची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड. 


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील चि. सत्यम रायभान धसाळ याची नुकतीच केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (सी.आर.पी.एफ.) निवड झाली आहे. त्याच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


सत्यम धसाळ याने मागील काही दिवसां पूर्वीच केंद्रीय राखीव पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या परीक्षा, मैदान, वैद्यकीय चाचणी आदी प्रक्रिया पूर्ण केलेल्या होत्या. संबंधित विषयाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये त्याची केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये निवड झाल्याचे जाहीर झाले. 


तो लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असून तांदुळवाडी येथील पत्रकार तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विनीत आनंदराव धसाळ यांचा पुतण्या आहे. सत्यम धसाळ याचे नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.