नारायणराव भगवंतराव डौले यांचे १०५ व्या वर्षी वृध्दाप काळाने निधन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यात धार्मिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान असलेल्या जोगेश्वरी आखाडा येथील हरिभक्त पारायण व प्रगतशील शेतकरी नारायणराव भगवंतराव डौले यांचे आज दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.२५ वाजता त्यांच्या राहत्या घरी वृध्दपकाळाने निधन झाले आहे. वयाच्या १०५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
नाना नावाने वारकरी संप्रदाय क्षेत्रात सर्वदूर परिचित व्यक्तिमत्त्व हरपल्याने सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डौले तसेच शंकरराव डौले यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, सहा मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर आज शनिवार १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. जोगेश्वरी आखाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
