नांदेड - माहुरच्या व्यापारी संकुलासाठी मिळालेली १९ कोटींची मंजुरी ही त्यांच्या प्रभावी नेतृत्वाची पावती - गोपु महामुने
प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड
माहूर येथील व्यापारी संकुलासाठी १९ कोटीचा निधी मंजुर
आ.भीमराव केराम यांच्या प्रयत्नाने मोठे यश.
नांदेड/माहूर,दि : २०:- माहूर नगर पंचायत हद्दीत व्यापारी संकुल उभारण्यासाठी शासनाने १९ कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती नगरसेवक गोपू महामुने यांनी दिली आहे. याकामी आ. भीमराव केराम यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता, त्याचे हे मोठे फलित होय.केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना २०२५-२६" अंतर्गत नगरपरिषद व नगरपंचायतींच्या विकास आराखड्यातील कामांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. त्यानुषंगाने माहूर नगरपंचायतीच्या विकास आराखड्यात व्यापारी संकुलाचा प्रस्ताव तयार करून संबंधित वास्तुविशारद संस्थेमार्फत शासनाला अंदाजपत्रक व नकाशे सादर करण्यात आले होते. नगररचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी संबंधित विभागांकडून तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यानंतर शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे माहूर शहराच्या व्यापारी व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक व्यापाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन मिळून शहराच्या एकूणच विकासात मोलाची भर पडणार आहे. माहूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार साहेब सातत्याने प्रयत्नशील असून, व्यापारी संकुलासाठी मिळालेली १९ कोटींची मंजुरी ही त्यांच्या प्रभावी नेतृत्वाची पावती आहे, असे मत भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामूने यांनी व्यक्त करून त्यांचें आभार मानले आहे.
