Type Here to Get Search Results !

नांदेड - जीवन केवळ भौतिक अस्तित्व नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार - अलताफ हुसेन


 

नांदेड - जीवन केवळ भौतिक अस्तित्व नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार - अलताफ हुसेन 



प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड


नांदेड/गोंडवडसा,दि :२१:- आज जीवनाचा हक्क कायदेशीररित्या हमी दिलेला असला तरी, प्रत्यक्षात लाखो लोक अजूनही सन्माननीय जीवनापासून वंचित आहेत. गरिबी, असमानता, जातीय भेदभाव, लिंग असमानता, बेरोजगारी, बेघरपणा आणि आरोग्य सेवांचा अभाव यासारख्या समस्या या अधिकाराच्या प्रत्यक्ष प्राप्तीमध्ये अडथळा आणतात. जीवन म्हणजे केवळ भौतिक अस्तित्व नाही तर सन्मानाने आणि आदराने जगण्याचा अधिकार देखील आहे.

असे   विचार मुव्हमेन्ट फॉर पीस ॲन्ड जस्टीस चे प्रदेश उपाध्यक्ष अलताफ हुसेन यांनी जिवनाचा अधिकार - सम्मानाने या अभियाना अंतर्गत गोंड वडसा येथे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात बोलत होते .

     नागरिकांना वास्तविकता प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा अधिकार मिळत आहे का ? ,

गरीब, दलित, अल्पसंख्यक यांचे साठी प्रतिष्ठेचा अर्थ , त्यांना रोज कोणत्या आव्हानांचा  सामना  करावा लागतो .महिला हिंसा, भेदभाव और  असुरक्षा ,संविधानाने दिलेले अधिकार,सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक असमानता , प्रशासकीय सेवा या वर सखोल चर्चा करण्यात आली .

                  "जीवनाचा अधिकार " आणि "प्रतिष्ठा" या संकल्पनांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे ,उपेक्षित लोकांचा आवाज मुख्य प्रवाहात आणने,सार्वजनिक सहभागाद्वारे संवैधानिक मूल्ये मजबूत करणे. हा अभियाना चा मुख्य उद्देश असल्याचे प्रास्ताविकात हाफीज अन्सार यांनी मांडले.


  छत्रपती संभाजी नगर येथे 1 फेब्रवारी 2026 रोजी तपाडिया  नाटय गृह येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात  सहभागी होण्याचे  आवाहन एमपीजे शहराध्यक्ष मोहसीन राज यांनी केले .