देड - उद्या माहूर बंदचा निर्णय ; गुरुवार दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रतिष्ठाने बंद !
प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड
नांदेड/माहूर,दि,२८: - कामाचा माणूस आणि शब्दांचा पक्का नेता म्हणून ओळखले जाणारे राज्याचे कणखर व जनतेचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे माहूर शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व आदरांजली म्हणून माहूर व्यापारी संघटनेतर्फे उद्या गुरुवार दुपारी १ वाजेपर्यंत शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने स्वेच्छेने बंद ठेवण्यात येणार आहेत.
आज बुधवार सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांना प्रत्यक्ष भेट देत बंदचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनीही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य दर्शवले.अजितदादांच्या अकाली जाण्याने राज्यासह माहूर तालुक्यातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून उद्या शहरात श्रद्धांजलीचा वातावरणात बंद पाळण्यात येणार आहे.
