Type Here to Get Search Results !

राहुरी - टेम्पोची चारचाकी वाहनाला जोराची धडक. - अज्ञात टेम्पो चालका विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल.

 



टेम्पोची चारचाकी वाहनाला जोराची धडक.


अज्ञात टेम्पो चालका विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल.


राहुरी - प्रतिनिधी- मनोज साळवे.


नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर राहुरी फॅक्टरी शिवारात भरधाव टेम्पोने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश शरद उंडे (वय २३, रा. काळे आखाडा, राहुरी) हे दि. २७ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आपल्या हुंडाई व्हेरना कार (क्र. एम एच १४ डिएन ००८८) मनमाड-नगर महामार्गावरून प्रवास करत होते. राहुरी फॅक्टरी परिसरातील कांती हॉटेलसमोर आले असता, पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने (क्र. एम एच ४३- एफ- ७२६८) त्यांच्या कारला जोराची धडक दिली.


ही धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अपघातानंतर टेम्पो चालकाने जखमीला कोणतीही मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता वाहन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.


याप्रकरणी ऋषिकेश उंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालका विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रवीण बागुल हे करत आहेत.