शेतीच्या वादाच्या कारणावरुन पती पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करुन धक्काबूक्की.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शेतीच्या वादाच्या कारणावरुन आरोपीने चारचाकी वाहनात जात असलेल्या पती पत्नीला रस्त्यात अडवून शिवीगाळ, दमदाटी करुन धक्काबूक्की केल्याची घटना राहुरी तालुक्यातील उंबरे ते केंदळ रोडवर दि. २७ जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडली.
संगिता महेश तारडे, वय ३८ वर्षे, ह्या राहुरी तालुक्यातील केंदळ येथे कुटुंबासह राहत असून त्यांचा सख्खा चुलत दिर विशाल तारडे हा तेथेच राहवयास आहे. दोघांची शेती शेजारी असुन त्यावरुन पूर्वी त्यांच्यात किरकोळ वाद झालेले आहेत.
दि. २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास संगिता तारडे, त्यांचे पती व मुलांसह त्यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीमधून केंदळ येथे जात असताना उंबरे ते केंदळ रोडवर त्यांच्या शेताच्या जवळ आरोपी मोटारसायकलवर आला व संगिता तारडे यांची गाडी अडवली.
तेव्हा आरोपीने संगिता तारडे व त्यांच्या पतीला शेतीच्या वादाच्या कारणावरुन शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच धक्काबुक्की करुन हात पाय काढुन हातात देण्याची धमकी देवुन निघुन गेला.
घटने नंतर संगिता महेश तारडे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी विशाल सुरज तारडे, रा. केंदळ, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ८८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१ (३), ११५ (२), १२६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
