Type Here to Get Search Results !

राहुरी - नगरपरिषदेत अरुण साळवे यांची विरोधी पक्षनेते पदी निवड

 नगरपरिषदेत अरुण साळवे यांची विरोधी पक्षनेते पदी निवड.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


भारतीय जनता पार्टीने राहुरी नगरपरिषदेत संघटनात्मक ताकद दाखवत नगरसेवक अरुण मोहन साळवे यांची विरोधी पक्षनेते पदी निवड केली. भाजपच्या सात नगरसेवकांनी मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांना या बाबतचे अधिकृत पत्र सादर करत ही निवड जाहीर केली.


नगरपरिषदेत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीचे १७ नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ताधाऱ्यांना सशक्त विरोध देण्यासाठी भाजपने रणनीती आखत विकास आघाडी विरुद्ध लढत देणारे सात नगरसेवक एकत्र आणले आहेत. या गटाचे गटनेते म्हणून चंद्रकांत ऊर्फ राजेंद्र उंडे यांची निवड यापूर्वीच करण्यात आली असून, आता विरोधी पक्षनेते पदी अरुण साळवे यांची नियुक्ती करून भाजपने आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे.


विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर अरुण साळवे यांचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सतिश फुलसौदर, गणेश खैरे, सचिन मेहेत्रे, सुनील पवार, अजित डावखर, कांतीलाल जगधने, नारायण धोंगडे, सुनील देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


नगरपरिषदेत विकास कामांवर लक्ष ठेवणे, जनहिताचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे आणि सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांना सक्षम पर्याय देणे, अशी भूमिका भाजपकडून घेतली जाणार असल्याचे संकेत या निवडीमुळे मिळाले आहेत. आगामी काळात राहुरी नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.