नांदेड - हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा ही आत्मबल व नवचैतन्याचा उर्जास्त्रोत - ज्योतिबा खराटे ,उबाठा जिल्हाप्रमुख
प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड
नांदेड/माहूर,दि २३:- हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले. त्यांनी आपल्या प्रखर भाषणांतून जनतेला प्रभावित करून आपला मराठी बाणा कायम जोपासल.बाळासाहेबांचे व्यक्तिमहत्व हे प्रखर होते. त्यांनी मराठी माणसाला एकवटण्याच्चे कार्य महाराष्ट्रात पार पाडले. राजकारणा पेक्षा समाजकारणावर भर देऊन सेवाभाव जोपासत जनकल्याणाचा मार्ग दाखवला. त्यामुळे आजही मराठी जनतेनध्ये बाळासाहेबांप्रती आदर कायम आहे. त्यांचे प्रेरणादायी विचार आजच्या युवा पिढीला आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये आत्मबल आणि नव चैतन्य निर्माण करणारे आहेत, असे प्रतिक्रिया उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी व्यक्त केले.
ज्योतिबा खराटे पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी बाणा आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान मराठी माणूस कधीही विसरणार नाही. मुखातून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव येताच अंगातील रक्त सळसळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासच माणसाला यशस्वी करीत असतो. माणसाचे आत्मबल नेहमी मजबूत असणे आवश्यक आहे, हे त्यांनी आपल्या कार्य कर्तुत्वातून दाखवून दिले. कोणती समस्या ही सहजा सहजी सुटत नसेल तर संघर्ष व आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही हे बाळासाहेबांनी आपल्या मराठी माणसाना पटवून दिल्याचे ज्योतिबा खराटे म्हणाले.

