Type Here to Get Search Results !

पुणे - उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या हस्ते प्रभाग ९ चा विकास प्रगती अहवाल प्रकाशित; ‘जनहितनामा’चे अनावरण

 उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या हस्ते प्रभाग ९ चा विकास प्रगती अहवाल प्रकाशित; ‘जनहितनामा’चे अनावरण





जिजाऊ बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा विकासाचा संकल्प; नागरिकांच्या जीवनमान उंचावण्याचा ठोस आराखडा सादर

 

पुणे प्रतिनिधी : जिजाऊ बंगला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांच्या हस्ते  प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामांचा सविस्तर प्रगती अहवाल प्रकाशित करण्यात आला. याच वेळी प्रभागातील जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि भविष्यातील विकासदृष्टी मांडणारा ‘जनहितनामा’ देखील प्रसारित करण्यात आला.

प्रभागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांगीण विचार करून हा जनहितनामा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. आतापर्यंत करण्यात आलेली विकासकामे, राबवलेले उपक्रम तसेच येत्या काळातील ठोस विकास आराखडा या प्रगती अहवालातून सविस्तरपणे मांडण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार अमोल बालवडकर,गायत्री मेढे-कोकाटे,  बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण उपस्थित होते. विकासासाठी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याचा आमचा ठाम संकल्प यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

प्रभाग ९ च्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असून, जनतेच्या विश्वासावर खरे उतरून विकासाचे राजकारण पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.