Type Here to Get Search Results !

संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची पुन्हा कारवाई, गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे 03 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करुन 5,53,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.


 क्रमांक: पीआरओ/प्रेसनोट/43/2026 प्रेस नोट दिनांक :- 06/02/2026

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची पुन्हा कारवाई, गोवंशीय जनावरांची  कत्तल करणारे 03 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करुन  5,53,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची व गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

वर नमुद पथक दिनांक 06/02/2026 रोजी पहाटे संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत जमजम कॉलनी, गल्ली नं. 9 संगमनेर येथे सोहेब मोहीद्दीन कुरेशी रा. संगमनेर हा त्याचे साथीदारासह महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्यास मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याचे दिसुन आले. पथक सदर इसमांना पकडण्यासाठी जात असतांना काही इसम पत्र्याचे शेडचे पाठीमागील दरवाजाने अंधारातुन पळुन गेले. सदर इसमांचा पाठलाग करता इसम नामे 1) साहेब मोहीद्दीन कुरेशी वय 23 वर्षे, रा. गल्ली क्र. 8, जमजम कॉलनी, संगमनेर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे पळुन गेलेल्या इसमांबाबत विचारपुस करता त्याने पळुन गेलेल्या इसमांची नावे 2) साहील उर्फ साद मुस्ताक कुरेशी, रा. जमजम कॉलनी, संगमनेर (फरार), 3) अयान महेबुब कुरेशी रा. मदीनानगर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगितले. वरील इसमांविरुध्द कारवाई करुन सदर ठिकाणावरुन 4,50,000/- रुपये किमतीचे 1500 किलो गोमांस, 1,00,000/- रुपये किमतीचे दोन जिवंत गोवंशीय जनावरे, 3000/- रुपये किमतीचा इलेक्ट्रीक वजनकाटा व 300/- रुपये किमतीचे 02 लोखंडी सुरे असा एकुण 5,53,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 127/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3 (5) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे  कलम 5, (ब), 5 (क), 9, 9 (अ) सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. 

सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.