Type Here to Get Search Results !

खडकवासला - शेकडो कुटुंबांचे आधारवड विनायक पानसरे यांचे निधन

 शेकडो कुटुंबांचे आधारवड विनायक पानसरे यांचे निधन



खडकवासला प्रतिनिधी :वडगाव बुद्रुक येथील रहिवासी विनायक लक्ष्मण पानसरे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, वाहतूक व कामगार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

कै. विनायक पानसरे यांनी कर्मवीर रिक्षा, ट्रक व टॅक्सी संघटनेच्या माध्यमातून शेकडो गरजू कुटुंबांना आधार देत अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. चालक व कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. सांगली, सातारा, पुणे तसेच सोलापूर जिल्ह्यांमध्ये मोफत वाहनचालक प्रशिक्षण शिबिरे व रोजगार निर्मिती कार्यशाळांचे आयोजन करून अनेकांना स्वावलंबी बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

ते कर्मवीर रिक्षा, ट्रक, टॅक्सी संघटनेचे चेअरमन तसेच भिमाई औद्योगिक संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. समाजकार्याची अखंड धडपड आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आपुलकी यामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती.

दैनिक पुढारीचे वार्ताहर मिलिंद पानसरे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पानसरे व विक्रांत पानसरे यांचे ते वडील होत.