Type Here to Get Search Results !

पारनेर : पारनेर कारखाना विक्री घोटाळ्यातील आरोपींचा जामीन रद्द.....!


 


पारनेर कारखाना विक्री घोटाळ्यातील  आरोपींचा जामीन रद्द.....! 


( सत्र न्यायालयाचा निकाल, आरोपींच्या अटकेच्या आदेश )


 पारनेर :  तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार  प्रकरणातील दहा आरोपींना दिलेला  अटकपूर्वक जामीन अहमदनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांनी रद्द केला आहे.  आरोपींमध्ये तलाठी किरण फातले,  क्रांती शुगर या खाजगी कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले,  संचालक पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले,जालिंदर नवले, गुलाब नवले,शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले  यांचा समावेश आहे.  पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर वर्षभरापूर्वी राज्य सहकारी बँक आणि क्रांती शुगर कंपनीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता.  पुढे सत्र न्यायालयाने आरोपींचा रिव्हीजन अर्ज फेटाळला,  त्यातंर आरोपींनी सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी  केलेला अर्ज  अटी-शर्ती नुसार मंजुर केला होता.  मात्र न्यायालयाने  घातलेल्या अटी - शर्तीचा भंग केल्याचा  प्रकार लक्षात येताच, याप्रकरणी फिर्यादी असलेल्या पारनेर कारखाना बचाव समितीने आरोपींचा अटकपुर्व जामीन रद्द करणे कामी सत्र न्यायालयात  अर्ज दाखल केला होता.  या गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी अटकपूर्वक जामीनाच्या  नावाखाली गैरफायदा घेऊन फिर्यादीवर  दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, गुन्ह्यातील  महत्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता,  तसेच तपासात पोलिसांना  सहकार्य करत  नसल्याचे  पुरावे  फिर्यादिकडुन न्यायालया समोर ठेवण्यात आले.

 सत्र न्यायालयाने या गंभीर प्रकाराची  दखल घेऊन आरोपींना मंजुर  केलेल्या अटकपूर्व  जामीनाचे  संरक्षण 

काढुन घेतले. आणि आरोपींना तातडीने अटक करून पुढील तपासाचे आदेश  पोलिसांना दिलेले आहेत.  याप्रकरणी  सुमारे ४८  बनावट सातबारा  उतारे तयार करणारा श्रीगोंदा - विसापुर  येथे सध्या कार्यरत असलेला तलाठी किरण फातले याचाहि  अटकपूर्व जामीन  जामीन न्यायालयाने रद्द केला आहे. 

⚫ तपास  यंत्रनेवर दबाव....!

गुन्हा दाखल होवून वर्षे लोटले आहे. गुन्ह्यात एकुन ४२ साक्षीदार आहेत. त्यांची यादि फिर्यादिने

तपासी अधिकारी यांना देवुनही आरोपींच्या राजकिय दबावापोटी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात नाहीत. 


⚫ तपासी अधिकार्‍याची तातडीने बदली....!

या गुन्ह्याचे तपासी अधिकारी असलेले  पारनेर पोलिस ठाण्याचे निरिक्षक समीर बारवकर यांची  मुदती पुर्वीच बदली करण्यात आली आहे.   त्यांची हि बदली या गुन्ह्यात आरोपींना मदत न केल्याच्या कारणाने केल्याचे कारखाना बचाव समितीचे बबन कवाद, साहेबराव मोरे यांनी सांगितले. 

सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांचे  समोर झाली, कारखाना बचाव समितीची बाजु  अँड. रामदास घावटे, अँड. सुदाम साठे, अँड. उन्मेश चौधरी यांनी, अँड. सोमनाथ गोपाळे मांडली.