Type Here to Get Search Results !

राहुरी - मा. मंत्री तनपुरे यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा.


 


मा. मंत्री तनपुरे यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा. 


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती मुसमाडे हे होते. 


यावेळी बोलताना तनपुरे  म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या कार्यालयाच्या उभारणीसाठी मी निधी उपलब्ध करून दिला, याचे विशेष समाधान वाटते. याच कालावधीत राहुरी तालुक्यात सुमारे १५ नवीन तलाठी कार्यालये व ग्रामपंचायत कार्यालयांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.


या नूतन इमारतीमुळे ग्रामस्थांसाठी दर्जेदार व सुसज्ज भौतिक सुविधा उपलब्ध होणार असून, शासकीय कामकाज अधिक जलद, पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयातून लोकसेवेचे कार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


ग्रामीण भागातील समस्या सोडवताना ग्रामीण भागातील महत्त्वाचा पाणी प्रश्न सोडवताना या ग्रामीण भागातील वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्याच्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निधीतून  १२५० कोटी रुपये निळवंडे धरण्याच्या कालव्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सांगत असताना पाणी हा प्रश्न ज्वलंत प्रश्न सोडवला तरी लोकांनी कौल दिला नाही याबद्दल खंतही व्यक्त केली.


यावेळी सुरेशशेठ वाबळे, डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक उ-हे, सुभाष डुकरे, रघुनाथ मुसमाडे, अण्णासाहेब खेमनर, किरण गव्हाणे, डॉ. रवींद्र गागरे, सुजीत वाबळे, सरपंच डॉ. उमेश नानासाहेब मुसमाडे, डॉ. सुधाकर मुसमाडे, अशोक नाना मुसमाडे, नितीन गागरे, सुनील शेलार, जालिंदर शेलार, भागवत गागरे, रमेश गागरे, तंटामुक्ती अध्यक्ष भीमराज बेलकर, प्रभाकर शेलार, सुनील मुसमाडे, काळू बबन मुसमाडे, बाळासाहेब मुसमाडे, सर्जेराव मुसमाडे, निवृत्ती पर्वत गागरे, अमोल गागरे, जालिंदर मुसमाडे, सागर मुसमाडे, राहुल गागरे, ज्ञानदेव गागरे, कचरू मुसमाडे, किशोर मुसमाडे, संकेत खेडेकर, अंकुश मुसमाडे, प्रवीण मुसमाडे, संतोष तांबे, भाऊसाहेब तांबे, अरुण मुसमाडे, राजेंद्र मुसमाडे, अरुण गागरे, मा. सरपंच नितीन गागरे यांनी प्रस्ताविक केले. सदस्य चंद्रकांत कांबळे आणि माजी सरपंच अशोक नाना मुसमाडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन मेजर ताराचंद गागरे यांनी केले.