Type Here to Get Search Results !

शिर्डी - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून अहील्यानगर जिल्ह्याच्या भेटीचे निमंत्रण तसेच राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार समारंभास वेळ देण्याची विनंती केली.


 


शिर्डी दि.१२ प्रतिनिधी


भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून अहील्यानगर  जिल्ह्याच्या भेटीचे निमंत्रण  तसेच  राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार समारंभास वेळ देण्याची विनंती केली.


दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.राष्ट्रीय अध्यक्ष पदावर झालेल्या निवडीनंतर पहीलीच भेट असल्याने अध्यक्ष नितीन नबीन यांचा सत्कार करून अभिनंदन केले.सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांचे "पायोनियर" जीवनचरित्र त्यांना भेट दिले.


राज्यात नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत अहील्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेल्या विजयाची माहीती देवून पक्षाने केलेल्या कामगिरीची माहीती  भेटी  दरम्यान दिली.


राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नितीन नबीन यांची निवड झाल्याबद्दल जिल्ह्याच्या वतीने अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करायचे आहे.याचे निमंत्रण भेटी दरम्यान दिले असून, लवकरच वेळ देण्याचे त्यांनी मान्य केल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.


भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात मंत्री विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली त्यांनाही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशाची माहीती दिली.माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच अन्य केंद्रीय पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.


सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्या प्रश्नाच्या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा,केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांचीही मंत्री विखे पाटील यांच्या भेटी घेवून प्रश्नाच्या संदर्भात चर्चा केली.


राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामास केंद्र सरकारचे पाठबळ मिळावे म्हणून केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना मंत्री विखे पाटील यांनी विनंती केली असून प्रकल्प मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार करीत असलेल्या निर्णयाची माहीती दिली.