महेश लोंढे व सुरज घोडके या दोन मित्रांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तू आमच्या टिपा पोलीसांना देतो का, असे म्हणुन आरोपींनी महेश लोंढे व त्याच्या मित्राला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील कानडगांव येथे दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.
महेश रामनाथ लोंढे, वय २५ वर्षे, हा तरुण राहुरी तालुक्यातील कानडगांव येथे राहत आहे. दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास महेश लोंढे व त्याचा मित्र सुरज अशोक घोडके हे दोघे घरी जात असताना कानडगांव येथील अहिल्यादेवी होळकर चौक येथे आरोपी आला व म्हणाला कि, तु आमच्या टिपा पोलीसांना देतो का. असे म्हणुन आरोपी राजमोहम्मद सय्यद याने महेश लोंढे याला दगड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच इतर आरोपींना बोलावुन घेतले. आरोपींनी महेश लोंढे याच्या गळ्यावर गळ्यावर चाकु ठेवला. तेव्हा त्याचा मित्र सुरज घोडके याने सदरचा चाकु हिसकावत असताना तो चाकु महेश याच्या मनगटा जवळ लागला. त्यानंतर सर्व आरोपींनी महेश व सुरज या दोघांना शिवीगाळ करुन दगड व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
महेश रामनाथ लोंढे याच्या फिर्यादीवरून आरोपी राजमोहम्मद बशीर सय्यद, साहिल शकिल सय्यद, शकिल इस्माईल सय्यद, शाहिन शकिल सय्यद, सर्व रा. कानडगांव, ता. राहुरी, या चार जणांवर गुन्हा रजि. नं. १७१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
