राजमोहम्मद सय्यद यांना शिवीगाळ दमदाटी करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तू पोलिसांना आमच्या टिपा देतो, असे म्हणुन आरोपींनी राजमोहम्मद सय्यद यांना शिवीगाळ दमदाटी करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कानडगांव येथे दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडली.
राजमोहम्मद बशीर सय्यद, वय ४६ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कानडगाव, घोरपडे वस्ती, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, राजमोहम्मद सय्यद हे दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास कानडगांव येथील गोपी मोताळेच्या जनरल स्टोअर्सच्या दुकाना समोर बसले होते.
तेथे आरोपी आले व म्हणाले की, तु आमच्या टिपा पोलीसांना देतो, असे म्हणुन आरोपींनी राजमोहम्मद सय्यद यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहान केली. तसेच त्यांच्या खिशातुन ४ हजार ५०० रुपये रोख रक्कम काढुन घेतली. त्यानंतर जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
राजमोहम्मद बशीर सय्यद यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी महेश रामनाथ लोंढे व सुरेश अशोक घोडके, दोघे रा. कानडगाव, ता. राहुरी, या दोघांवर गुन्हा रजि. नं. १७२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११९ (१), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
