वासुंद्यातील नानकर मळा-दावलमलिक रस्त्याचे भूमिपूजन
सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
पारनेर/प्रतिनिधी :
वासुंदे गावातील नानकर मळा ते दावलमलिक रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
या रस्त्याच्या विकासामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी शेतकऱ्यांना अवजार, ट्रॅक्टर व पिकाची ने-आण करताना अडचणी येत होत्या. आता हा रस्ता सुधारित होत असल्याने शेतमालाची वाहतूक सोपी होईल. रस्त्याचे रुंदीकरण करून पक्का रस्ता झाल्यास वाहतूक सुरळीत होईल. अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
वासुंदे परिसरात गेल्या काही काळात स्थानिक अनेक रस्त्यांचे प्रश्न सुजित झावरे पाटील यांच्यामुळे मार्गी लागले आहेत.
यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांचे आभार मानले.
हा रस्त्यामुळे ग्रामीण भागाच्या प्रगतीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी गुरुदत्त पतसंस्था चेअरमन बा. ठ. झावरे, जेष्ठ नेते भागूजी झावरे, माजी उपसरपंच शंकर बर्वे, शरद पाटील, रणजित पाटील, सरपंच विमल झावरे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, चेअरमन सूर्यभान भालेकर, व्हा. चेअरमन लक्ष्मण झावरे, विलास साठे, पो. मा. झावरे, रामदास झावरे,भाऊसाहेब सैद, बाळासाहेब झावरे, लहानू झावरे, रा. बा. झावरे, इंजि. निकील दाते, दिलीप पाटोळे, सोन्याबापू बर्वे, बी एम झावरे सर, सुभाष शिंदे, श्रीकांत साळुंके, मारुती उगले, शांताराम झावरे, शिवाजी झावरे,निवृत्ती बर्वे, संपत झावरे, भिकाजी झावरे, पा. ल. बर्वे, सुभाष राऊत, अंकुश झावरे, स्वप्नील झावरे, संभाजी झावरे, डॉ. प्रसाद झावरे, निवृत्ती झावरे, ओंकार झावरे, संदीप झावरे, अक्षय झावरे, आदी यावेळी उपस्थित होते.
चौकट :
वासुंदे येथील स्थानिक रस्त्यांचा प्रश्न सुजित झावरे पाटील यांच्यामुळे मार्गी लागत आहे. त्यामुळे स्थानिक वाहतूक सोपी झाली असून शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. रस्त्यांमुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे. यापुढेही असेच प्रश्न मार्गी लावून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा.
बा. ठ. झावरे (चेअरमन, गुरुदत्त पतसंस्था)
