Type Here to Get Search Results !

राहुरी - सरपन तोडण्यास विरोध करुन काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण.


 


सरपन तोडण्यास विरोध करुन काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


चिमाजी तमनर हे सरपन तोडीत असताना आरोपींनी विरोध करून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करुन काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे घडली. 


चिमाजी तबाजी तमनर, वय ८५ वर्षे, धंदा शेती, रा. तमनर आखाडा, ता. राहुरी यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, चिमाजी तमनर यांची तमनर आखाडा शिवारात शेती असून ती शेती त्यांची आई मंदाबाई व सावत्र आई जनाबाई यांच्या नावावर आहे.


दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास चिमाजी तमनर हे त्यांच्या शेतात सरपन काढण्याकरीता गेले होते. तेथे आरोपी कैलास तमनर हा आला व म्हणाला की, हि जमीन आमची आहे, तुम्ही येथे सरपन तोडू नका. तेव्हा चिमाजी तमनर त्याला म्हणाले, ही जमिन तुझी सावत्र आई जनाबाई आण्णासाहेब तमनर हिची आहे. तिचा राहुरी कोर्ट येथे वाद चालू आहे. कोर्ट जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य राहील.


तेव्हा आरोपी कैलास तमनर म्हणाला, हि जमीन माझ्या बापाची आहे, तु तुझ्या सावत्र आईकडून जमीन घे व आमचे पैसै देवून टाक. त्यानंतर सर्व आरोपींनी चिमाजी तमनर, त्यांची पत्नी व मुलाला शिवीगाळ करुन काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.


चिमाजी तबाजी तमनर यांच्या फिर्यादीवरून आरोपी कैलास आण्णासाहेब तमनर, विलास आण्णासाहेब तमनर, जिजाबाई कैलास तमनर, मंदाबाई आण्णासाहेब तमनर, सर्व रा. तमनर आखाडा, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ११६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला