बांदावरील झाड तोडण्यास विरोध केल्याने कुऱ्हाड व लाथा बुक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
बांदावरील झाड तोडण्यास विरोध केल्याने आरोपींनी पती पत्नीला शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कुऱ्हाड मारुन जखमी केल्याची घटना दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.
कैलास उर्फ कल्याण आण्णासाहेब तमनर, वय ४० वर्षे, धंदा शेती, रा. तमनर आखाडा, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, कैलास उर्फ कल्याण तमनर यांची तमनर आखाडा परिसरात शेती आहे. दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास कैलास उर्फ कल्याण तमनर हे गाईना चारा काढण्याकरीता शेतात गेले होते.
त्यावेळी चिमाजी तमनर हा लाकडे तोडत होता. तेव्हा कैलास उर्फ कल्याण तमनर त्यांना म्हणाले की, हा आमचा बांध आहे, हे झाडे तोडू नको. असे म्हणाल्याचा राग आल्याने कैलास उर्फ कल्याण तमनर व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कुऱ्हाड मारुन जखमी केले.
कैलास उर्फ कल्याण आण्णासाहेब तमनर यांच्या फिर्यादीवरून आरोपी बबई चिमाजी तमनर, सविता रामदास तमनर, चिमाजी तबाजी तमनर, भानुदास चिमाजी तमनर, रामदास चिमाजी तमनर, सर्व रा. तमनर आखाडा, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ११५/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५१ (२), ३५२, १८९ (१), १८९ (२), १९१ (१), १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
