काहीएक कारण नसताना दोघा बाप लेकाला बेदम मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
काहीएक कारण नसताना आरोपींनी दोघा बाप लेकाला शिवीगाळ करुन लाकडी दांडा, लोखंडी राॅड व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली.
मयुर दादा वाघमारे, वय ३४ वर्षे, रा. सात्रळ, ता, राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.२० वाजेच्या सुमारास मयुर वाघमारे हे त्यांच्या घरी असताना आरोपी तेथे आले व मोठ मोठ्याने शिवीगाळ करुन बाहेर ये. तु जर बाहेर आला नाहीतर तुला जिवे ठार मारु, असे म्हणाले. मयुर वाघमारे हे घाबरुन घरा बाहेर आले नाही.
त्यानंतर दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मयुर वाघमारे हे सात्रळ गावात झेडपी कॉम्प्लेक्स समोर पाणीपुरीच्या गाडीवर पाणीपुरी खात होते. तेव्हा तेथे आरोपी आले शिवीगाळ करुन मारहाण करत होते. तेव्हा मयुर वाघमारे यांचे वडिल तेथे आले. तेव्हा आरोपींनी दोघा बाप लेकाला शिवीगाळ करुन लाकडी दांडा, लोखंडी राॅड व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तुला जिवे ठार मारुन टाकु, अशी जिवे मारण्याची धमकी दिली.
मयुर दादा वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय सुनिल पंडीत, वैभव पंडीत, सुनिल पंडीत, तिघे रा. सात्रळ, ता. राहुरी तसेच दोन अनोळखी व्यक्ती अशा पाच जणांवर गुन्हा रजि. नं. १२७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, १८९ (१), १८९ (२), १९१, १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
