तु आमचा बांध का कोरला असे म्हणत दोघा मायलेकाला मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तु आमचा बांध का कोरला असे म्हणत आरोपींनी दोघा मायलेकाला शिवीगाळ करुन काठी, कुऱ्हाड व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे दि. ६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान घडली.
शंकर चिमाजी तमनर, वय २७ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे राहतात. त्यांच्या घरा शेजारी त्यांचा चुलता भिमाजी पर्वत तमनर हा त्याच्या कुटूंबासह राहतो. दोघांत शेतीच्या बांधावरून नेहमी वाद होत असतात. दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शंकर तमनर हे घरात असताना आरोपी तेथे आले व म्हणाले कि, तु आमचा बांध का कोरला.
असे म्हणुन आरोपींनी शंकर तमनर व त्यांच्या आईला शिवीगाळ करून काठी, कुऱ्हाड व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही परत आमच्या नादी लागले तर तुम्हाला मारून टाकु, अशी धमकी देऊन तेथुन निघुन गेले.
लागले तेव्हा चुलत भाऊ बाळासाहेब भिमाजी तमनर यांने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने पाठीमागून डोक्यात मारून जखमी केले व भिमाजी पर्वत तमनर यांने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने उजव्यापायाच्या नडगीवर मारून जखमी केले व पुतण्या प्रतिक बाळासाहेब तमनर याने त्याच्या हातातील काठीने मारहाण करत असताना माझी आई पदमाबाई तमनर हि आमचे भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आली असता तिला अलका बाळसाहेब तमनर, जिजाबाई भिमाजी तमनर यांनी लाथाबुक्यानी मारहाण करून
त्यानंतर दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शंकर तमनर हे शेतात जात असताना आरोपी बाळसाहेब तमनर हा म्हणाला कि, तु पोलीस स्टेशनला केस करून दाखव, तुझ्याकडे पाहतो, असे म्हणुन शिवीगाळ करून लाथा बूक्क्यांनी मारहाण करून निघुन गेला.
शंकर चिमाजी तमनर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी भिमाजी पर्वत तमनर, बाळासाहेब भिमाजी तमनर, प्रतीक बाळासाहेब तमनर, अलका बाळसाहेब तमनर, जिजाबाई भिमाजी तमनर, सर्व रा. तमनर आखाडा, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. १२६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३३३, १८९ (२), १९०, १९१ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
