Type Here to Get Search Results !

राहुरी - मुलाला शिविगाळ दमदाटी केल्याचा जाब विचारला म्हणून बाप लेकाला मारहाण.


 


मुलाला शिविगाळ दमदाटी केल्याचा जाब विचारला म्हणून बाप लेकाला मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


माझ्या मुलाला तुम्ही शिविगाळ दमदाटी का केली, असे विचारल्याचा राग आल्याने आरोपींनी दोघा बाप लेकाला शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. 


सुनिल आण्णाक्लेथ पंडीत, वय ५४ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे राहत आहे. दि. १७ जानेवारी रोजी सुनिल पंडीत यांचा मुलगा अक्षय पंडीत यास मयुर वाघमारे याने आगोदरच्या वादातुन शिविगाळ करुन धमकी दिली होती.


दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुनिल पंडीत हे सात्रळ गावातुन झेडपी कॉम्पेक्स येथुन जात असताना पाणीपुरीच्या दुकानाजवळ त्यांना आरोपी दिसले. त्यावेळी सुनिल पंडीत हे त्यांना म्हणाले कि, माझ्या मुलाला तुम्ही शिविगाळ दमदाटी का केली. असे विचारले असता त्यांना राग आल्याने त्यांनी सुनिल पंडीत यांना शिविगाळ दमदाटी करुन लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. 


तेव्हा त्यांचा मुलगा अक्षय पंडीत हा सोडवण्यासाठी तेथे आला असता त्याला देखील आरोपींनी शिविगाळ दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी देऊन लाकडी काठीने मारहाण केली. 


सुनिल आण्णाक्लेथ पंडीत यांच्या फिर्यादीवरून आरोपी दादा शंकर वाघमारे, मयुर दादा वाघमारे, दोघे रा. सात्रळ, ता. राहुरी तसेच दोन अनोळखी इसम अशा चार जणांवर गुन्हा रजि. नं. १२९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३ (५), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.