रॉंग साईडने वाहन टाकणाऱ्या व रंगीत काचा ६८ वाहनावर कारवाई.
राहुरी पोलिस पथकाने कारवाई करुन एकूण ५० हजार १५० रुपये दंड वसूल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
सध्या अहिल्यानगर ते मनमाड जाणाऱ्या महामार्गाचे काम चालू असून राहुरी शहरांमध्ये एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. तरी सदर वाहतूक ही मंद गतीने चालू असते. तरी गर्दीमध्ये रॉंग साईडने आपली वाहने घेऊन सदरची वाहतूक ही जाम केली जाते. अशा वाहन चालकावर दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रॉंग साईडने वाहन टाकणाऱ्या व रंगीत काचा वाहनधारकावर ६८ वाहनावर एकूण ५० हजार १५० रुपये दंड वसूल करण्यात आला.
त्यापैकी ब्लॅक काचा, रंगीत काचा वाहन चालकचे २५ वाहनावर कारवाई करून २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तरी याद्वारे नागरिकांना अहवान करण्यात येते की आपण आपली वाहने एकेरी लेनमध्ये ठेवावी. कोणतीही वाहने रॉंग साईडने टाकू नये.
जेणेकरून ट्राफिक जामच्या प्रश्नाला आपणास सामोरे जावे लागेल व त्यामुळे सामान्य नागरिकांना नाहाक त्रास होतो व आपणास दंडात्मक कारवाई सामोरे जावे लागेल. तसेच आपले वाहनाचे रंगीत काचा ब्लॅक काचा काढून घ्याव्यात. अशी राहुरी पोलीस स्टेशन वाहतूक विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री सोमनाथ वाकचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री जयदत्त भवर, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब आव्हाड पोलीस पोलीस हवालदार ठोंबरे, दरेकर, फुलमाळी यांनी केली आहे.
