Type Here to Get Search Results !

श्रीगोंदा - चिमुकल्यांच्या दातृत्वातून उभारली १५ मे टन धान्याची बॅक , अग्नीपंखचा अजित पवार यांना श्रद्धांजलीपर उपक्रम

 चिमुकल्यांच्या दातृत्वातून उभारली १५ मे टन धान्याची बॅक 

अग्नीपंखचा अजित पवार यांना श्रद्धांजलीपर उपक्रम




श्रीगोंदा = राजकारण हा धर्म आणि राज्याचा विकास हेच कर्म मानून महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे स्व. अजित पवार यांना श्रध्दांजली म्हणून अग्नीपंख फौंडेशनने एक मुठ धान्य अनाथांसाठी हा प्रेरणादायी उपक्रम राबवला  चिमुकल्यांच्या हृदयस्पर्शी हृदयस्पर्शी दातृत्वातून १५ मे टन धान्याची बॅक तयार झाली आहे  १७ वसतीगृहाना धान्य रुपी शिदोरी वाटप करण्यात येणार आहे. 


१० ते १६ फेब्रुवारी दरम्यान ६१शाळा विद्यालयात 

 एक मुठ धान्य अनाथांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला धान्य संकलनाचा शुभारंभ येळपणेत माजी मंत्री बबनराव पाचपुते वांगदरीत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे श्रीगोंद्यात घनश्याम शेलार तहसीलदार सचीन डोंगरे नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस उपनगराध्यक्षा अलका अनभुले माजी नगराध्यक्षा शुभांगी पोटे उद्योजक प्रशांत बोत्रेपाटील गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी घोगरगाव मध्ये बाबासाहेब भोस, बेलवंडीत आण्णासाहेब शेलार कोळगावात डॉ प्रणोती जगताप इनामगाव मध्ये उद्योजक प्रकाश कुतवळ तर बाबुर्डीत गटविकास अधिकारी राणी फराटे यांचे हस्ते आला. 

 बुधवारी देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेत खासदार निलेश लंके यांचे हस्ते धान्य संकलनाचा सांगता करण्यात आली. 

यावेळी निलेश लंके म्हणाले उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे श्रध्दांजली  म्हणून अग्नीपंख राबविलेल्या या उपक्रमातून माणुसकी आणि आठवणीचे दर्शन घडले आहे. श्रीगोंद्यातील ६१ शाळा विद्यालयातील विद्यार्थी यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, सामाजिक जाणीव जपणाऱ्या मुलांचे दातृत्व पाहून  मन भरून आले आहे .

प्रास्ताविक अग्नीपंख फौंडेशनचे कार्याध्यक्ष प्रा संजय लाकूडझोडे तर प्राचार्य विशाल डाके संतोष इथापे यांनी केले 

यावेळी सुरेश लोखंडे सुभाष वाघमारे सचीन गव्हाणे नवनाथ दरेकर उपस्थित होते सुत्रसंचलन संदीप घावटे यांनी केले आहे. 


  शिरुर येथील श्री. मनःशांती छात्रालयास १ मे टन धान्य देऊन धान्य वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.