Type Here to Get Search Results !

राहुरी - समाजोपयोगी उपक्रम राबवून शिवजयंती साजरी. - महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुरी शहर व तालुका यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात.



 


समाजोपयोगी उपक्रम राबवून शिवजयंती साजरी.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुरी शहर व तालुका यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राहुरी शहर व तालुका यांच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरातील संत गाडगेबाबा आश्रम येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली.


या कार्यक्रमात विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक उपयोगी साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच गोशाळेमध्ये जनावरांसाठी चारा वाटप करून पर्यावरण व पशुसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमा दरम्यान आश्रमातील शिक्षकवृंदांनी आपले मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला व विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.


यावेळी डीजे साऊंड सिस्टीमच्या कर्कश आवाजाला फाटा देत साधेपणाने व शिस्तबद्ध पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. समाजाप्रती जबाबदारी जपत सामाजिक उपक्रमांद्वारे जयंती साजरी करण्याचा संदेश मनसेच्या वतीने देण्यात आला.


याप्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, देसवंडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन (आप्पा) कल्हापुरे, मनसे शहराध्यक्ष प्रतिक विधाते, उपतालुकाध्यक्ष राहुल पिले, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, विद्यार्थी सेना जिल्हा संघटक सागर माने, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष संदेश गायकवाड, सचिव युवराज कोकाटे, महेश (जालु) घाडगे, अमर देठे आदी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तसेच विशेष सहकार्य राहुरी कृषी बाजार समिती सभापती अरुणसाहेब तनपुरे, तहसीलदार अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, निबंधक खेडकर साहेब, बांधकाम विभागाचे सय्यद सर, कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे,आरोग्य अधिकारी दिपाली गायकवाड, महावितरण प्रमुख बारसे साहेब तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी, पत्रकार व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे लाभले.


सामाजिक उपक्रमांमुळे जयंती कार्यक्रमाला आगळेवेगळे व समाजोपयोगी स्वरूप प्राप्त झाले.